प्राथमिक शिक्षक सहकारी बँक

         सावकारी पाशातून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता व्हावी या हेतूने २१ आक्टोबर १९२४ रोजी "आपली करा आपणच सोडवणूक" या तत्वाने कै. कृ. भा. बाबर यांचे पुढाकाराने व १४ प्रवर्तकांसह मसूर ता. कराड येथे "सातारा  जिल्हा लोकल बोर्ड प्राथमिक शिक्षक सोसा. लि., " या नावाने संस्थेची स्थापना केली यावेळी तीन मुख्य उद्देश ठरविणेत आले.

    • अडीअडचणीचे वेळी शिक्षकांना कर्ज रूपाने आर्थिक मदत करणे.
    • शिक्षकांना आर्थिक बचत करण्याची सवय लावणे
    • परिस्थिती सुधारताच शिक्षकांच्या हिताच्या योजना आखून त्या अमलात आणणे.

         यानंतर दि. १७ एप्रिल १९४८ रोजी संस्थेची विभागणी उत्तर व दक्षिण सातारा होवून जिल्ह्यातील कराड व पाटण तालुके वगळून २ तालुक्यांसाठी "सातारा जिल्हा लोकल बोर्ड उत्तरभाग प्राथमिक शिक्षकांची सह. बँक लि., सातारा" या नावाने कामकाजास सुरुवात झाली. पुढे काळाचे ओघात नवनवीन  बदल होत गेले व दि. १७-१०-८१  रोजी "प्राथमिक  शिक्षक सहकारी बैंक लि., सातारा" असे सुटसुटीत  व नवे  नाव बँकेने धारण केले. सध्या संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र करणेत बँक यशस्वी झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या १२  शाखा  व हेड ऑफिस असे कार्यक्षेत्र आहे.

     

रिझर्व्ह बँकेकडील सूचनेनुसार  दहा वर्ष व त्यावरील कालावधी होऊनही  व्यवहार न झालेल्या  खात्यावरील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे DEAF फंड खाती वर्ग केलेली असून त्याची आज अखेरची यादी खालील प्रमाणे असून संबंधित ठेवीदारांनी शाखेकडे संपर्क साधावा. 




CONTACT US
Prathamik Shikshak Sahakari Bank LTD., Satara
12/B,Raviwar Peth, Satara, Maharashtra 415002
02162-234046
Leave A Message