slider-image
slider-image
slider-image
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक

     सावकारी पाशातून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता व्हावी या हेतूने २१ आक्टोबर १९२४ रोजी "आपली करा आपणच सोडवणूक" या तत्वाने कै. कृ. भा. बाबर यांचे पुढाकाराने व १४ प्रवर्तकांसह मसूर ता. कराड येथे "सातारा  जिल्हा लोकल बोर्ड प्राथमिक शिक्षक सोसा. लि., " या नावाने संस्थेची स्थापना केली यावेळी तीन मुख्य उद्देश ठरविणेत आले.

  • अडीअडचणीचे वेळी शिक्षकांना कर्ज रूपाने आर्थिक मदत करणे.
  • शिक्षकांना आर्थिक बचत करण्याची सवय लावणे
  • परिस्थिती सुधारताच शिक्षकांच्या हिताच्या योजना आखून त्या अमलात आणणे.

     यानंतर दि. १७ एप्रिल १९४८ रोजी संस्थेची विभागणी उत्तर व दक्षिण सातारा होवून जिल्ह्यातील कराड व पाटण तालुके वगळून २ तालुक्यांसाठी "सातारा जिल्हा लोकल बोर्ड उत्तरभाग प्राथमिक शिक्षकांची सह. बँक लि., सातारा" या नावाने कामकाजास सुरुवात झाली. पुढे काळाचे ओघात नवनवीन  बदल होत गेले व दि. १७-१०-८१  रोजी "प्राथमिक  शिक्षक सहकारी बैंक लि., सातारा" असे सुटसुटीत  व नवे  नाव बँकेने धारण केले. सध्या संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र करणेत बँक यशस्वी झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या १२  शाखा  व हेड ऑफिस असे कार्यक्षेत्र आहे.

 


रिझर्व्ह बँकेकडील सूचनेनुसार  दहा वर्ष व त्यावरील कालावधी होऊनही  व्यवहार न झालेल्या  खात्यावरील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे DEAF फंड खाती वर्ग केलेली असून त्यांची दिनांक ३०/०९/२०२३ अखेरची यादी खालील प्रमाणे असून संबंधित ठेवीदारांनी शाखेकडे संपर्क साधावा. 



शाखा
0 +
शाखा
सभासद
0 +
सभासद
एकूण व्यवसाय
0 +
एकूण व्यवसाय
नफा
0 +
नफा